हिरापूर येथून जवळच असलेल्या फळ रोप वाटिके जवळ एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्त्ति चे नाव शिवराम केशव झरकर वय ५० वर्षे आहे. सावली जवळील हिरापूर येथील शिवराम केशव झरकर (SHIVRAM KESHAV JHARKAR) हे १२ नोव्हेंबर रोजी नवेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून परत येत असतांना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याना गंभीर दुखापत झाली.
जखमी अवस्थेत त्यांना गडचिरोली रुग्णालयामध्ये नेत असताना वाटेतच त्यांचं मृत्यू झाला. अपघात झालेल्या वाहनाचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

