अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली जिल्हा छत्र उदघोष विद्यार्थी जिल्हा संमेलन गडचिरोली येथे पार पडले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून, पद्मश्री श्री.परशुरामजी खुणे झाडीपट्टी नाटक कलावंत गडचिरोली उपस्थित होते तसेच प्रमुख वक्ते श्री .राकेशजी पटेल सहसंयोजक अखिल भारतीय जनजाती विद्यार्थी कार्य अभाविप, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अनिल चिताडे सर संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्रमूख उपस्थिति प्रा. धर्मेंद्र मुनघाट अभाविप गडचिरोली विभाग प्रमुख, व शक्ती जी केराम प्रांत मंत्री उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रमुख वक्ते राकेश जी पटेल म्हणाले या भारताला स्वतंत्र मिळाले नाही तर या देशाला स्वतंत्र मिळावा या साठी कित्येक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पण आता आपण तरुणांना या देशासाठी मारायची वेळ नाही देशासाठी जगायचं आहे.
आजचा तरुण विद्यार्थीच या भारताला परम वैभव प्राप्त करून देऊ शकतो. प्रांत मंत्री शक्ती जी केराम म्हणाले गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असेल प्रत्येक व शेवटच्या विद्यार्थ्यांना त्याचा हक्क मिळवून देण्याच काम विद्यार्थी परिषद करून दाखवते. ठीक करेंगे टीम काम प्रवेश परीक्षा परिणाम हे केवळ अभाविप चा नारा नसून अभाविप ने हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवले आहे.
आणि लवकरच जर या सरकारने खुल्या छात्र संघ निवडणूका सुरू केल्या नाही तर राज्य सरकार विरोधात आंदोलन करू असे प्रतिपादन अभाविप विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम यांनी जाहीर सभेत विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले. कार्यक्रम तीन सत्रात मध्ये पार पडले पहिला सत्र उद्घाटन व भाषणात्मक सत्र, दुसरा सत्र प्रस्तावना मांडणी, तिसरा सत्र शोभायात्रा व जाहीर सभा घेण्यात आली, गडचिरोली नगरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली व इंदिरा गांधी चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याच्या छात्र नेत्यांनी जाहीर सभेत NEP , प्रवेश परीक्षा व परिणाम, महिला सक्षमीकरण, विश्वगुरू भारत या विषयावरील संबोधित केले जिल्हा संमेलन चा समारोज राहुल जी श्यामकुवर नगर विस्ताक यांनी केले व एकूण उपस्थिति *968* होती .
विद्यार्थी.444
विद्यार्थीनी.467
प्राथापक.21
अन.36
एकूण. 968

