Chimur: सर्प मित्राने अलगद पकडले | त्या सापाला बघ्यांची जमली गर्दी घटनास्थळी !

0


बुधवार दि. 9 नोव्हेंबर: चिमूर तालुक्यातील नेरी येथील बाजार चौकातील परिसरात जतीन कन्फेशनरी यांचे दुकाना समोरील ठेवलेल्या मिठांच्या बॅगामध्ये नागिन शिरल्याचे जाणा-या येणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुकान मालक गिरडकर यांना याची माहिती दिली. साप खरंच बॅगामध्ये शिरला की नाही याची खात्री झाल्यानंतर गिरडकर यांनी भ्रमणध्वनी वरून सर्प मित्र मुन्ना शेख यांना या बाबत माहिती दिली.


सर्पमित्रांने क्षणाचा विलंब न करता आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून सापाला पकडून जीवदान दिले. मुन्ना शेख यांचे कार्यकर्ते येत पर्यंत साप तिथून निघून विशाल कॅम्पुटरच्या दुकाना जवळ आला. साप बघणाऱ्यांची गर्दी खूप असल्यामुळे सापाला कोणी मारणार तर नाही ना याची दक्षता घेण्यात आली. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते पोहचून सापाला पकडण्यात आले.


हा साप ही नागिन असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. सापाच्या शेपटीला जखम असल्यामुळे त्यांनी समोरील उपचार करण्यासाठी सोबत घेऊन गेले.सदरहु सापाला सर्प मित्रांकडून अश्या प्रकारे आज जीवनदान देण्यात आले.


कोरपणा तालुका प्रतिनिधी: मनोज गोरे


Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top