Korpana : नांदा व बीबी येथे झालेली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक कोरपना तालुक्यातील आवाळपुर नांदा यापरिसरामध्ये असलेले सिमेंट कंपन्याचे वास्तव्य शिवाय स्थानिक युवकांची बेरोजगारी व शासनामध्ये सहभागी असलेल्या पक्ष्यांची व नेत्यांची उदासीनता या सर्व बाबींना समोर ठेवून विरूर गाडेगाव आवाळपूर नांदा फाटा बीबी या परिसरातील शेकडो नवयुवक सुशिक्षित बेरोजगारांनी चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा सचिव प्रकाश बोरकर मनसेचे कार्यकर्ते भास्कर लोबळे, पुरुषोत्तमजी पुट्टवार ,बंडू गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमाजी उरकुडे ,रामा चिंचोलकर, मनोहर उदापुरे ,अविनाश श्रीराम, कैलास ताकसांडे, कपिल शिडाम, विठ्ठल कैलास गोरे ,शुभम कोसरे ,अविनाश काकडे ,वैभव राजूरकर, कुणाल मुठ्ठलकर ,अनिल निकाळे, संतोष कोरांगे, राजू कोळापे राजकुमार बांदुरकर, हनुमान काकडे यांच्यासोबतच शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज साहेब ठाकरे अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षांमध्ये प्रवेश केल्याने परिसरातील राजकीय समीकरण येणाऱ्या काळात बदलल्याचे चित्र नक्कीच पहायला मिळेल.
शिवाय याच परिसरात अल्ट्राटेक मुरली ऍग्रो दालमिया अंबुजा माणिकगड अशा नवाजलेल्या मोठमोठ्या सिमेंट कंपन्या असताना रोजगाराच्या बाबतीमध्ये स्थानिक युवकांना जाणून बुजून डावल्या जात असल्याचे चित्र नाकारता येत नाही.
त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा याकरिता मोठे आंदोलन उभारले जाईल व स्थानिकांना योग्य तो न्याय दिला जाईल असे मत जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी व्यक्त केले नवप्रवाशीत सर्व कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतीक असलेले दुपट्टे प्रदान करण्यात आले
कोरपना तालुका प्रतिनिधी: मनोज गोरे

