Gadchiroli : तालुकास्तरीय स्पर्धेत संजीवनी विद्यालय, अव्वल

0

 


Gadchiroli: शालेय सत्र 2022 - 23 मध्ये घेण्यात आलेल्या तालुका क्रिडा स्पर्धाचे आयोजन जिल्हा क्रिडा संकुल, जिल्हा कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे करण्यात आले. या स्पर्धेत संजीवनी विद्यालय, नवेगांव येथील विद्यार्थ्यांनी 17 वर्षे वयोगटात बॅडमिंटन स्पर्धेत मुलांनी बाजी मारून जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता आपला प्रवेश निश्चित करून शाळेची मान उंचावली आहे. विजयी चमुमध्ये नकुल रणदिवे, शौर्य शंकरवार, धृवल साईनवार, यश भांडारकर, सुजल समर्थ यांचा समावेश होता.


तसेच तालुका स्तरीय योगासन स्पर्धेत विद्यालयातील 17 वर्षे वयोगटातील मुलींनी बाजी मारून जिल्हास्तरीय आपला प्रवेश निश्चित केला आहे. विजयी चममध्ये पुर्वा बोलनवार, ईशा लोंढे, रूद्रानी गेडाम, अंजली मोहुर्ले, गुंजन मेश्राम या विद्यार्थीनींचा समावेश होता.


तसेच तालुका स्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात कु. चैतन्या कोरडे व 14 वर्षे वयोगटात कु. मानवी भांडारकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता पात्र ठरल्या आहेत.

याबद्दल विजयी स्पर्धेकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. डी. सोनटक्के, सचिव श्री एस. के. पोरड्डीवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. के. भैसारे, सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top