पुण्यात एक धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. एका 17 वर्षीय मुलीवर वडील आणि चुलत्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
तरुणी तिच्या मूळ गावी 2016 ते 2018 दरम्यान गेली असता तिच्यावर चुलता विजयने अनेक वेळा बलात्कार केले तर आजोबा रामेश्वरने तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती पीडिता पुण्यात कुटुंबियांसोबत राहण्यास आल्यानंतर वडील अजयने देखील तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
संपूर्ण घटना तिच्या महाविद्यालयातील एका समुपदेशना दरम्यान उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केली असून अन्य दोघांना देखील अटक करण्यात येणार आहे.

