Gadchiroli: शालेय सत्र 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा जलतरण क्रिडा स्पर्धाचे आयोजन जिल्हा क्रिडा संकुल, जिल्हा कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे घेण्यात आले. या स्पर्धेत संजीवनी विद्यालय, नवेगांव येथील वर्ग 10 वी चा विद्यार्थी यश प्रमोद भांडारकर 17 वर्षे वयोगटात व वर्ग 7 वी ची विद्यार्थीनी कु. मानवी प्रमोद भांडारकर 14 वर्षे वयोगटात बाजी मारल्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांची वर्धा येथे होणा-या जलतरण स्पर्धेकरीता निवड झाली आहे.
याबद्दल विजयी स्पर्धेकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. डी. सोनटक्के, सचिव श्री एस. के. पोरेड्डीवार, संजीवनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. के. भैसारे, संजीवनी उच्च प्राथमिक शाळा नवेगांव चे मुख्याध्यापक श्री. एन. के. चुटे, सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

