Bhadravati News : मासळ येथे लोकवर्गणीतून पांदन रस्त्याचे सुधाकर रोहनकर यांच्या हस्ते लोकार्पण

0

 


भद्रावती,दि.२१(तालुका प्रतिनिधी) शाम चटपल्लीवार

      भद्रावती तालुक्यातील मासळ येथील लोकवर्गणीतून तयार करण्यात येणाऱ्या पांदन रस्त्याचा लोकार्पण सोहळा नंदोरी-कोकेवाडा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, भटाळीचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्या हस्ते नुकताच पार पडला.


     सदर रस्ता हा मासळ वस्ती ते मुख्य रस्त्यावरील नाल्यापर्यंत १ कि.मी. लांबीचा पांदन रस्ता असून लोकवर्गनीतून अंदाजे १५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मासळ ग्राम पंचायतीचे सरपंच प्रमोद मुंडरे, उपसरपंच प्रफुल टोंगे, नीलिमा ठक, नंदाताई काकडे, सुरेखा जिवतोडे, अश्विनी आत्राम, राघो पाटील  काकडे, पाडुरंग केळकर,अविनाश महाजन, श्रीकांत टोंगे, सुरेश क्षीरसागर, दिलीप चौधरी, भोला पाटील टोंगे, प्रमोद बावने, बंडु टोंगे, भजन मंडळी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


      यावेळी सुधाकर रोहनकर यांचा शाल व श्रीफळ देऊन मासळवासीयांतर्फे सत्कार करण्यात आला. सदर कामामुळे  नागरिकांची गैरसोयीतून मुक्तता होणार आहे. या सर्व रस्त्यांची कामे दळणवळण अधिक बळकट करण्यासाठी लाभदायक ठरणार आहेत.नवीन पिढी व्यसनाधीन नव्हे, तर विधायक ठरावी असे कार्य ग्रामीण भागात चैतन्य निर्माण करते.

      

      गावागावांतील तरुण पिढी ही व्यसनाधीनतेच्या आहारी जावू नये.आपल्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कार्य केल्या जावे हीच अपेक्षा आहे.  आपण केलेला माझा सम्मान मला जनतेची कामे करण्याकरिता प्रेरित करणार  म्हणून मी आपला ऋणी आहे. असे मनोगत सुधाकर रोहनकर  यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. यावेळी मासळवासियांनी गावातील मुख्य रस्त्याने ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॉली काढून आपला आनंद व्यक्त केला.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top