Uttar Pradesh News : अबब! बेवड़याने चकण्यात खाल्ला कुत्र्याचे शेपुट अन कान

0

 


उत्तरप्रदेश - माणसाला दारूची नशा झाली की काही गप्प तर काही सैतान रुपात येतात, अश्याचं एका दारुड्या सैतानाने मुक्या जनावरांसोबत क्रूर कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे.  दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने कुत्र्यांच्या पिल्लांची शेपटी व कान चकना म्हणून खाल्ले.


सदर घटना फरीदपूर बरेली जिल्ह्यातील आहे, आरोपी मुकेश वाल्मिकी याने दारूच्या नशेत मुक्या जनावरांसोबत असा क्रूर प्रकार केला. प्राणिप्रेमी व पीपल फॉर संघटनेचे धीरज पाठक यांनी मुकेश वाल्मिकी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


आरोपी मुकेश हा आपल्या मित्रांसोबत दारू पीत असताना बाजूला असलेले कुत्र्यांचे पिल्ले याला पकडत त्यांचे कान व शेपूट चकना म्हणून कापले व त्यानंतर त्यावर मीठ लावत मुकेश ने ते खाल्ले, त्यानंतर ते 2 पिल्ले रक्तबंबाळ अवस्थेत पडून राहिले पोलिसांना याबाबत माहिती मिळताच जखमी पिल्लांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.


वरिष्ठ पोलीस अधीक्षक अखिलेश चौरसिया यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top