SAOLI CHANDRAPUR NEWS: धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशीही वाघाने घेतला दुसरा बळी

0

 सावली तालुक्यातील रुद्रापुर येथील १४ डिसेंबर ची घटना ताजीच असताना आज दी.१५ डिसेंबर २०२२ ला सावली तालुक्यातीलच खेडी या गावामध्ये कापूस वेचणी करिता गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.  घटनेमध्ये मृत पावलेल्या महिलेचे नाव




सरूबाई प्रशांत येलट्टीवार वय (४५) रा. खेडी त. सावली जि. चंद्रपूर असे आहे.ही घटना सकाळी ११.०० वाजता च्या दरम्यान घडली.


सदर माहितीनुसार दररोज प्रमाणे गावातील महिला शेतातील कापूस वेचणी करिता गेल्या. सर्व महिला जेवण करण्या साठी बसलेल्या असताना एक महिला थोडी बाजूला उभी होती. बाजूलाच लपून बसलेल्या वाघाने संधी साधून त्या महिलेवर हमला करून तिला जागीच ठार केलं. बाकी च्या महिलेला हे समजताच त्यांनी आरडाओरड सुरू  केली,त्यामुळे वाघ तिथून पळून गेला.घटनेची माहिती गावातील लोकांना समजताच तिथे ग्रामस्थांची गर्दी झाली, तसेच सावली पोलिस सुद्धा घटना स्थळावर येऊन पुढील तपास करीत आहेत.

                                         स्थानिक प्रतिनिधी- ऋतिक अलाम 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top