Bhadravati News : दर्दनाक घटना ! विहिरीत ऊडी घेतांना महिलेची प्रसुती, मातेसह अर्भकाचाही मृत्यु.

0


तालुका प्रतिनिधी (भद्रावती)- शाम चटपल्लीवार

Bhadravati :- शहरातील नविन सुमठाणा परिसरात एका विहिरीत गरोदर महिलेने आत्महत्या केली.आत्महत्येसाठी विहिरीत ऊडी घेतल्यानंतर त्या महिलेची प्रसुती झाली व मातेसोबतच त्या नवजात अर्भकाचाही दुर्दैवी मृत्यु झाला. दिनांक 25 ला सकाळी मृत अर्भकाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.दिनांक 24ला शहरातील श्रीरामनगर येथे राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेने शहरातील नविन सुमठाणा परिसरातील एका विहिरीत ऊडी घेऊन आत्महत्या केली.हि महिला नव महिण्यांची गर्भवती होती.


तिचे शवविच्छेदन केल्यानंतर लहान बाळ पोटात आढळून आले नाही.त्यानंतर पोलिसांनी या अर्भकाला शोधण्यासाठी सदर विहिरीचे पाणी नगरपालीका प्रशासनाच्या मदतिने तोडण्यात आल्यानंतर शेवटी हे नवजात अर्भक विहिरीत आढळून आले त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले.माता व अर्भकाच्या मृत्युमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top