Saoli Nimgaon News: हृदयविदारक घटना ! संपूर्ण गावात हळहळ

0

SAOLI: व्याहाड खुर्द येथून जवळच असलेल्या निमगाव येथे बैल धुण्याकरिता तलावावर गेलेल्या तरुणाचे  आज दि. २८/१२/२०२२ अत्यंत दुःखद निधन झाले. घटनेने संपूर्ण गावात सध्या दुःखाचे वातावरण पसरलेले आहे.


घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव रोशन चालिगांजिवार  वय २८ वर्ष निमगाव असे आहे. प्राप्त माहतीनुसार सदर घटनेत मृतक हा बैल धून्याकरिता गावा बाहेरील तलावात गेला होता, ही घटना सकाळी ८.०० ते ९.०० च्या दरम्यान घडली. मृतक हा विवाहित असून त्याच्या मागे पत्नी, मुले, आई,बाबा,भाऊ असा परिवार आहे.घटनेने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकी मृत्यू कशी झाली यासंदर्भात पक्की माहिती नाही, कारण घटनास्थळी कुणीच प्रत्यक्ष दर्शी नव्हते.


पण काही गावकरी च्या मते मृतक हा नेहमी बैल धुताना बैलाचे कासरे (दोर) हे खांद्यावर ठेवून धुत असायचा,काही लोकांचा अंदाज आहे की बैलांच्या अचानक हालचाली मुळे खांद्यावरच्या दोर गळ्यात लटकला असावा  किंवा बैलाची लात लागली असावी आणि त्यांचा मृत्यू झाला असावा ,  पण या संदर्भात पक्की अशी माहिती नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top