Bhadravati News : चारचाकी वाहनात आढळले देशी बनावटीचे पिस्तूल, माजरी येथील दोघांना अटक

0


भद्रावती,दि.२९(तालुका प्रतिनिधी)- शाम चटपल्लीवार

      पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या चौकशीत एका चारचाकी वाहनात देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आल्याने माजरी येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.

      प्राप्त माहितीनुसार, दि.२८ डिसेंबर रोजी एम.एच.३४, बी.आर.८५९३ क्रमांकाची बलेनो कार नागपूरकडून चंद्रपूरकडे येत असून त्या कारमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.  त्यानुसार पोलिसांनी वरोरा येथील रत्नमाला चौकात नाकेबंदी करून सदर कार अडवण्यात आली. त्या कारची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. 


      याप्रकरणी पोलिसांनी पुन्नमचंद येलय्या मारकरी (३४) रा. चैतन्य काॅलनी, माजरी आणि अभिलाष ओदेलू पंचल (३०) रा. माजरी काॅलरी वार्ड क्रं.५ माजरी यांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार, देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतूस, दोन भ्रमणध्वनी असा एकूण ५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


     ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, सपोनि राजकिरण मडावी, पोलिस हवालदार जुमडे, नापोकॉ गुरनुले, अनिल बैठा, पोशि शिंदे,  दिपक,  काकडे, चापोशि मंडल, प्रवीण निकोडे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top