Gadchiroli: पासून जवळच असलेल्या मुरखळा नवेगाव येथील बस स्टॉप वर अचानक एका मजुराचा मृत्यू पावल्याची धक्कादायक घटना आज दी.०६/०१/२०२३ ला दूपारी ४.३० च्या सुमारास घडली. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार मृतक मिस्त्री कामावर आलेला होता, परंतु अचानक प्रकृती खराब झाल्यामुळे तो दुपारीच घरी जाण्याकरिता मुरखळा येथील बस्थानकासमोर उभा होता. तिथे त्याला उलटी झाली व त्याची जागीच मृत्यू झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शि चे म्हणणे आहे. घटनास्थळी गडचिरोली पोलिस पोचली व पुढील तपास करीत आहे.
सदर घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव मुकुंदा लाकडे असे असून ते अंतरगाव येथील रहिवासी होते. या घटनेने मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तसेच गावामध्ये शोककळा पसरली आहे.

