Gadchiroli: नुकतीच आग्रा येथे झालेल्या तिसऱ्या हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी भाग घेतला, ज्यामध्ये महाराष्ट्र संघाने दुसरा क्रमांक पटकाविला.
या यशाबद्दल त्यांचं आलापल्ली येथे सन्मान करण्यात आले. यावेळी तिथे हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट असोसिएशन (hand to hand fighting association) महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. राहुल मेश्राम, संघ प्रशिक्षक श्री रवी चेर्लावार सर, व खेळाडू रवी चेर्लावार, सुजल आड़े, ओम गंधशिरवार, अनन्या शामलवार , कस्तुरी एरणेवार , आधीश्री बर्डे, नूपुर बोडे, प्रयुक्ति मगरे, सुरेश मडावी यांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आलापल्ली ग्रामपंचायत तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उप वनसंरक्षक राहुल टोलिया साहेब ,ग्रामविकास अधिकारी मस्के साहेब , आलापल्ली रुग्णालय डॉ. उईके मॅडम, आलापल्ली ग्रा. प.सरपंच शंकर भाऊ मेश्राम व ग्रापंचायत सदस्य सोमेश्वर भाऊ रामटेके,मनोज भाऊ बोलूवार ,पुष्पा ताई अलोणे व सर्व ग्रां. प. सदस्य उपस्थित होते.

