मूल ते नागभिड मार्गावर काल दी.14/01/2022 ला रात्रौ पहाटे 3.00 वाजता च्या दरम्यान एका ट्रकचा जबर अपघात झाला. ही घटना सिंदेवाही पासून जवळच असलेल्या पळसगाव येथील नाल्यावर घडली.सदर घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही हे विशेष. ट्रक मध्ये ड्रायव्हर सोबत कुणीही अतिरिक्त व्यक्ती नव्हती.अपघात इतका भीषण होता की, ट्रक हा 20 फूट खोल नाल्यात खाली कोसळला.
सविस्तर माहितीनुसार ड्रायव्हर (च्या अनुसार )मुल वरून ब्रम्हपुरी ला जात होता,वाटेत पळसगाव च्या नाल्याजवल आल्यावर समोरच येणाऱ्या एका टीप्परचा संतुलन बिघडलं आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गाडी बाजूला घेतली. पण गाडी नाल्यावर असल्यामुळे वं बाजूला जागा नसल्याने पुलाच्या एंगल ला लागून टायर फुटला व गाडी पुलाच्या खाली कोसळली.


