प्रतिनिधी- ऋतिक अलाम
सावली: प्रजासत्ताक दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले,तसेच ठीक ठिकाणी त्या निमित्ताने विविद्ध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावली तालुक्यातील खेडी या गावामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्यामधील असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांचे असलेले कोशल्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच त्यांना आपल्या मधील कलागुण सादर करता यावेत या करिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेडी तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Celebrating republic day या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून मा. सचिन कातपल्लिवर सरपंच ग्रापंचायत खेडी, अध्यक्ष अनिल माचेवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन खेडी तसेच विशेष अतिथी म्हणून विजय जी कोरेवार माजी सभापती पंचायत समिती सावली आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास समस्त गावकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमातून शेतकऱ्यांचा आत्महत्या, झाडे लावा -झाडे जगवा,बेटी बढाव- बेटी पढाव, स्वच्छतेचे महत्त्व,व्यसन मुक्ती, भारत आणि संस्कृती, आई वडिल तसेच मोठ्याचा आदर आदी विषयावर नाट्य, सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले. उपस्थित गावकरीनी खूप आनंद घेतला व अशाच प्रकारे दरवर्षी कार्यक्रम घेण्या यावे अशी प्रतक्रियाही दिली.
पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक वृंद श्री नवनीत कंदालवर जी.प.प्रा.शाळा मुख्याध्यापक खेडी, कू. सुमित्रा कुमरे, श्री राजेन्द्र उराडे,श्री सुमित देवगडे आणि माधुरी निंबाळकर यांनी खूप मेहनत घेतली.


